July 19, 2009

संध्यामठ

कोल्हापूरचा ऐतिहासिक रंकाळा तलाव स्वच्छतेसाठी यंदाच्या उन्हाळ्यात पाणी सोडून बराचसा रिकामा करण्यात आला होता.. त्यावेळी वर्षभर पाण्यात असणारा हा संध्यामठ असा अंतरंग दाखवुन गेला. त्याची ही काही दुर्मिळ छायाचित्रे...













...आणि आता पाऊस पडू लागल्यावर हा संध्यामठ परत नेहमीसारखे पाण्यात बुडून गेला आहे.. काही दिवसांपूर्वी दै. पुढारी मध्ये प्रसिद्ध झालेले हे छायाचित्र...

June 08, 2009

...पाऊस!!

...पाऊस!!
शब्दाच्या उच्चारानंच काहीतरी भरून येतं,बरसू लागतं...
आतल्या हुरहुरी जाग्या होतात...विरहाचे कढ डोळ्यांतून वाहू लागतात. पुन्हा पाऊसवाटांना गती येते,मन शरणागतीला येतं. जुनी नाती नव्यानं जुळवू पाहतं...
वाटतं...,इथली हार इथली जीत कुठं नोंदली जाणार आहे?
पण हा ॠतू निसटून गेला तर...
तर मग काय....उन्हाळाच...!!!



...पाऊस!!
रस्ते भिजताहेत..प्रतिबिंब रस्त्याला अगदी बिलगून चालताहेत..
कोपर्‍यावरचे कॉफी हाऊस, दोन फिल्टर कॉफी.. वाफाळलेला कॉफीगंध.. नाकातून थेट पोटात.. वाफेपलीकडे.. एक निस्तब्ध मन.. बोलू पाहातंय.. पण न बोलताही ऐकू येतंय....
मधेच ताडपत्री जोरात वाजू लागते.. झाड आवेगात कोसळू लागते.. सहज काही थेंब वार्‍यानं येतात..थोडं भिजतो..
सुखावतो...
कॉफीचा एक कडक कडक घुटका अलगद घेतो...समजूतदार पापण्या एकमेकांकडे पाहतात...
पाऊस बरसतच राहतो.. कॉफी संपते.. वेटर जवळ येतो; आपण ढगात पाहत म्हणतो....,"और एक कॉफी कडक!"

May 28, 2009

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज १२६ वी जयंती आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्य त्यांच्या प्रेरणादायी स्मृतींना त्रिवार विनम्र अभिवादन...!!!!

May 20, 2009

गर्लफ्रेण्ड नसण्याचा अभिमान

अहो ऐकलं का ?
आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!


आमच्या बाईकच्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
आणि बाईक पूसण्याचे आम्ही कधीच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!



सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तासभर खातो
आणि बुड्ढी का बालचा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!


वीकएंड्ला आऊटींग करतो, फ़क्त मित्रांबरोबर्च घालवतो
काही नाही तर मस्त झोपा काढतो
आणि रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!


आमचे मोबाईलचे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्त घरी किंवा मित्रांना असतात,
आणि आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!


मित्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!

कवी - अज्ञात.