December 12, 2008

कोल्हापूर- नाद नाही करायचा...

रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला महाद्वारच्याच पोरी भावतात ॥

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात ॥

'गोकुळ' कितीही स्वस्त झालं तरी 'कट्यावरच' गर्दी असेल,
आणि तांबड्या पांढ-या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल ॥

'थेम्स' च्या काठी बसलो तरी 'रंकाळ्याचीच' आठवण असेल,
'रॅप' कितीही ऐकले तरी 'लावणी' ऐकुनच मान डुलेल ॥

'केक- पेस्ट्रीज'कितीही खा, त्याला इथल्या गुळाची चव नाही,
आणि 'आडिडास' च्या शूजला इथल्या 'पायताणाची' सर नाही ॥

अरे कितीही मोठे झालो तरी तोंडात झणझणीत शिवी असेल,
आणि फाडफाड इंग्रजी बोललो तरी रांगडी कोल्हापुरीच हवी असेल ॥

'क्रिकेट- फुटबोल' काहीही येवो 'कुस्तीचा' मान त्याला नाही,
आणि इंग्लंडच्या लंडनलाही 'कोल्हापूर'ची शान नाही ॥

2 comments:

मिलिंद said...

वा! वा!! आणि वाहवा!!

साधक said...

लय भारी !!
आवडली कविता….भवना छान व्यक्त केल्यात. मायला अशी कविता आम्हाला कधी जमेल?