Hi this is my first blog..
This is my favourite poem--
जपत किनारा शीळ सोडणे नामंजूर
अन वा~याची वाट पहाणे नामंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर
मला ॠतुंची साथ नको अन कौल नको
मला कोठल्या शुभ शकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा
वेळ पाहुनी खेळ मांडणे नामंजूर
माझ्या हाती विनाश माझा कारण मी
मोहासाठी देह ठेवतो तारण मी
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रुचे थिटे पहाणे नामंजूर
रुसवे फुगावे भांडण तंटे लाख कळा
आपला तुपला हिशोब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन घ्यावी
गगानाशी नेणे गा~हांणे नामंजूर
No comments:
Post a Comment