December 29, 2007

मित्रांनो तुमच्यातही एक बबन आहे

मिस्टर अँड मिसेस बबन,
हे एक जोडपं भन्नाट होतं...
तिचं वजन सत्तरच्या वर,तर त्याचं फक्त पन्नास होतं!
ती होती मस्त गुळाची ढेप,
बबन नुसताच काटकुळा ऊस...
मिस्कीलपणे त्यांच्या जोडीला,
लोकं म्हणती "उंदीर आणि घूस"!

एकदा तिने बबनला विचारलं,
माझी वाटते का रे तुला लाज?
हसून बबन म्हणाला तिला,
परत बोलू नको, बोललीस जे आज!
बारीक वा जाडी तू माझी आहेस,
तुझ्याशीच गुंफला प्रेमाचा धागा आहे...
कितीही आकार वाढला तुझा तरीही,
हृदयात मावशील एवढी जागा आहे!
उत्तर ऐकून ती फार सुखवली,
आनंदाने तिची हास्यलाली फुलली...
तुम्हाला वरलं हे माझं सौभाग्यचं आहे,
पुन्हा पुन्हा ती हे प्रेमाने बोलली!

मित्रांनो तुमच्यातही एक बबन आहे,
कदाचित झोपला असेल, त्याला जागवा...
आणि बायको कित्तीही वाढली तरीही,
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!!
बबनप्रमाणेच तिला प्रेमाने वागवा!!!
कवि--अज्ञात

No comments: