December 12, 2008
कोल्हापूर- नाद नाही करायचा...
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला महाद्वारच्याच पोरी भावतात ॥
मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात ॥
'गोकुळ' कितीही स्वस्त झालं तरी 'कट्यावरच' गर्दी असेल,
आणि तांबड्या पांढ-या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल ॥
'थेम्स' च्या काठी बसलो तरी 'रंकाळ्याचीच' आठवण असेल,
'रॅप' कितीही ऐकले तरी 'लावणी' ऐकुनच मान डुलेल ॥
'केक- पेस्ट्रीज'कितीही खा, त्याला इथल्या गुळाची चव नाही,
आणि 'आडिडास' च्या शूजला इथल्या 'पायताणाची' सर नाही ॥
अरे कितीही मोठे झालो तरी तोंडात झणझणीत शिवी असेल,
आणि फाडफाड इंग्रजी बोललो तरी रांगडी कोल्हापुरीच हवी असेल ॥
'क्रिकेट- फुटबोल' काहीही येवो 'कुस्तीचा' मान त्याला नाही,
आणि इंग्लंडच्या लंडनलाही 'कोल्हापूर'ची शान नाही ॥
November 19, 2008
हे खरे आहे ना ?
देव उत्तरला, " मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो.
तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही."
November 14, 2008
फाळणी
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता
सरळ जाण्याचा हाच एक फायदा होता ---१
स्वर्गात जाताच टिळक भेटले
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले
,-- टिळकांनी विचारले...
कय रे स्वातंत्र्यानंतर काही बदललंय का नाही?
म्हटलं, छे हो, सरकारचं डोकं ठिकाणावर नाही
तिथून लगबगीने सुभाषबाबु आले
विचारु लागले खाली नेमके काय झाले? -- २
मी म्हणालो, नेताजी काय काय म्हणुन घडतय हल्ली
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली!
नेताजी, आजही आम्ही स्वातंत्र्यासाठी रक्तच देतो,
फक्त 'खुन' आमचं असतं आणि आझाद काश्मिर होतो! --३
तितक्यात... दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो,
म्हटलं 'तात्या' आज जन्माचं पुण्य पावलो
म्हटलं सध्या तरी सगळं कसं निवांत आहे
स्वर्गात कॉंग्रेस वाला नाही तर सगळं कसं शांत आहे. --४
त्यांनाच विचारलं..
तात्या इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौधातुन आपल्याकडेच पाह्तात!
'छत्रपतिंचा विजय असो'म्हणुन चटकन हात जोडले
पण घडलं भलतच, ते माझ्यावरच ओरडले,
-काय रे? कोणत्या जेम्स लेनने म्हणे बत्तमिजी केली?
तुमची अक्कल तेव्हा सांगा कोठे चरायला गेली? --५
मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती
आणि महाराजांची नजर माझ्यावरून ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, तुमची स्वप्नं आम्हाला कळलीच नाही
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे सावज हेरतात
ब्र म्हणायचा अवकाश, लगेच गाढवांचे नांगर फिरतात. --६
सगळं ऐकुन महाराजांच्या गालावरचे कल्ले थरारले
आमचं केविलवाणं जगणं बघुन डोळ्यांत पाणी तरारले,
क्षणभर राजेपण विसरुन ते दुःखाने थरथरले,
आणि मग आमचं अस वागणं बघुन रागाने बिथरले. --७
पाय लटपटले...
वाटलं आता कम्बख्ति भरलीच म्हणुन समज,
चुकीची शिक्षा, आता गर्दन मारलीच म्हणुन समज
पण मेलेल्याला मारायला ते 'खुर्चीतले नेते' नव्हते,
न्याय-कठोर असले, तरी ह्रदय त्यांचे 'रीते' नव्हते. --८
म्हणाले, नांव सांग फक्त, खाली जाऊन समाचार घेतो,
सांगितलं खाली 'लोकशाही'त प्रत्येकाचा विचार होतो,
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो
आणि पैसेवाला दुस-यांच्या जिवाशी खेळतो --९
फक्त एकच काळवीट मारले म्हणत आपले माजोरडे नाक उडवतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो
महाराजांनी मुश्किलीने डोळ्यांतलं पाणी अडवलं,
कळलं हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवलं. --१०
मान खाली घालुन मग तसाच पुढे गेलो...
अहो आश्चर्यम! स्वर्गामध्ये औरंग्या भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला.
जिन्हा सुद्धा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल,
आणि एके दिवशी मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल... --११
कवी- सौरभ वैशंपायन
October 21, 2008
तेच ते तेच ते
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच
रंजनतीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच
शहाणेसकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते
खानावळीही बदलून पाहील्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार
संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच' मंदिर ' तीच ' मूर्ती
'तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी
करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्माही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण, जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते
कवी - विंदा करंदीकर
June 27, 2008
पसायदान
पसायदान - विश्वगीत
आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें।
तोषोनि मज द्यावें। पसायदान हें।।
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।।
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।।
दुरितांचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।।
जो जें वांछील तो तें लाहो। प्राणिजात।।
वर्षत सकळमंगळीं। ईश्वर निष्ठांची मांदियाळी।।
अनवरत भूमंडळीं। भेटतु या भूतां।।
चलां कल्पतरूंचे अरव। चेतना चिंतामणीचें गांव।।
बोलते जे अर्णव। पीयूषाचे।।
चंदमे जे अलांच्छन। मार्तंड जे तापहीन।।
ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु।।
किंबहुना सर्वसुखीं। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।।
भजिजो आदिपुरुखीं। अखंडित।।
आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इयें।।
दृष्टादृष्टविजयें। होआवें जी।।
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दानपसावो।।
येणें वरें ज्ञानदेवो। सुखिया जाला।।
........................
May 28, 2008
सावरकरांच्या लोकप्रिय कविता
अनादि मी अनंत मी , अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।
--------------------------------------------------------------------------
सागरास
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा , प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा , प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला
--------------------------------------------------------------------------
हिंदु नृसिंह
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-
तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी
ओजा हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी
बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
--------------------------------------------------------------------------
जयोस्त्तु ते
जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं , नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।
स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय
तुला कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी
दिधली पूर्वीची ममता
सरली परक्यांची दासी झाली
जीव तळमळे , कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
--------------------------------------------------------------------------
May 22, 2008
वपूर्झा
संस्कृती - पु. ल. देशपांडे
May 16, 2008
दिवानो की बाते है...
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?
जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ?
तेरी गली मे हो आये
होश वही खो जाए
दिख जाये अगर तू पलभर
मैखाने मे जाये कौन ?
गली गली मे फ़िरते है
कई ठोकरें खाते
जब तुनेही ठुकराया हमे
अब हमको अपनाये कौन ?
दिवानो की बाते है...
February 13, 2008
चुकली दिशा तरीही...
हुकलें न श्रेय सारे;
वेड्या मुशाफ़िराला सामील सर्व
तारेमी चालतो अखंड, चालायचे म्हणून;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे;
हें शीळ तोडले कीं अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनाचा मीं फाडला नकाशा;
विझले तिथेंच सारे ते मागचे इशारे.
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हें जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.
आशा तशी निराशा, हें श्रेय सावधांचे;
बेसावधांस कैसे डसणारे हे निखारे.
पु॰ ल॰ देशपांडे
*****************************************************************
"जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तेवढं सुख नाही बोलत. सुख माणसाला मुकं करतं, वेदनेच्या पोटी सुंदर बोलणं येतं,नाही ? ’’
- पु॰ ल॰ देशपांडे