December 10, 2009
'सागरा प्राण तळमळला...' कवितेला १०० वर्ष पूर्ण
देशभक्ती आणि मातृभुमीपासून झालेली ताटातूट या भावनेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १० डिसेंबर १९०९ रोजी इंग्लंडमधील ब्रायटनच्या समुद्र किनारी बसून "सागरा प्राण तळमळला' या लिहिलेल्या कवितेस आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. वीर सावरकरांच्या स्म्रुतीस विनम्र अभिवादन...!
September 22, 2009
July 28, 2009
जस्संच्या तस्सं राहील का सारं?
आणखी एक अफलातुन कवीता....कुठेतरी वाचनात आली...पहा वाचुन तुम्हाला कशी वाटते ...
जस्संच्या तस्सं राहील का सारं?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं??
धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे?
रिझल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न- काय हे?
सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप,
आजीबरोबर लावलेलं पहिलंवहिलं रोप
ती दीड रूपया भाड्याची सायकल
ब्रेकडान्स आणि मूनवॉक करणारा तो मायकल
खांद्यावर दिसेल का ती आडिडासची बॅग?
अन् मानेला रुतेल का तो नव्या शर्टाचा टॅग?
आवडती छत्री हरवेल का परत?
मोडतील का बेत आल्यावर ठरत?
शाळेतला मित्र मारेल का परत हाक?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक?
ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट?
आऊट कसा झालो कारण चांगली नव्हती बॅट?
होईल का ब्लॅक अँड व्हाईटचा कलर?
पाहिल्यावर एकदम चोरेल का ती नजर?
आईस्क्रीमची ती टिंग टिंग ऐकून पळतील का पोरं?
झाडावरची पाडुया का जांभुळ नि बोरं?
जस्संच्या तस्सं राहील का सारं?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं??
पण...
जस्संच्या तस्सं सारं काही राहत नाही
थांबवायला गेलो वारं तर,
वादळ आल्याशिवाय राहत नाही
धपाटा मारण्यासाठी तरी
आई जवळ हवी होती,
अन् दरवाज्यातल्या कारपेक्षा वाटतं
की जुनी सायकलच बरी होती...
आडिडास असो वा आणखी काही,
आजीच्या हातच्या लोणच्यापुढं
सारं काही दास आहे,
त्यांचीच आठवण येऊन आज
मन मात्र उदास आहे...
आठवणीच्या या सावल्यांकडे
मी आजकाल पाहत नाही
थांबवायला गेलो वारं तर,
वादळ आल्याशिवाय राहत नाही...
पुर्वी छत्री हरवली होती, आता छत्रही हरवलं आहे
प्रेयसीला लिहीलेलं पहिलंवहिलं पत्रही हरवलं आहे,
पावसाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे
तिची छबी नवी होती,
नजर चुकवण्यासाठी तरी आज
ती जवळ हवी होती
एरवी मुसळधार पावसातही चिंब भिजणारा मी
आजकाल पावसाच्या वाटेलाही जात नाही,
थांबवायला गेलो वारं तर,
वादळ आल्याशिवाय राहत नाही...
काळ बदलला...वेळ बदलली...
देश बदलला...वेश बदलला...
नाती बदलली...माती बदलली...
तरीसुद्धा... तरीसुद्धा...
मन काही प्रवाहाबरोबर वहायला तयार होत नाही...
खरंच....जस्संच्या तस्सं सारं काही राहत नाही

July 19, 2009
संध्यामठ
कोल्हापूरचा ऐतिहासिक रंकाळा तलाव स्वच्छतेसाठी यंदाच्या उन्हाळ्यात पाणी सोडून बराचसा रिकामा करण्यात आला होता.. त्यावेळी वर्षभर पाण्यात असणारा हा संध्यामठ असा अंतरंग दाखवुन गेला. त्याची ही काही दुर्मिळ छायाचित्रे...

...आणि आता पाऊस पडू लागल्यावर हा संध्यामठ परत नेहमीसारखे पाण्यात बुडून गेला आहे.. काही दिवसांपूर्वी दै. पुढारी मध्ये प्रसिद्ध झालेले हे छायाचित्र...
...आणि आता पाऊस पडू लागल्यावर हा संध्यामठ परत नेहमीसारखे पाण्यात बुडून गेला आहे.. काही दिवसांपूर्वी दै. पुढारी मध्ये प्रसिद्ध झालेले हे छायाचित्र...

June 08, 2009
...पाऊस!!
...पाऊस!!
शब्दाच्या उच्चारानंच काहीतरी भरून येतं,बरसू लागतं...
आतल्या हुरहुरी जाग्या होतात...विरहाचे कढ डोळ्यांतून वाहू लागतात. पुन्हा पाऊसवाटांना गती येते,मन शरणागतीला येतं. जुनी नाती नव्यानं जुळवू पाहतं...
वाटतं...,इथली हार इथली जीत कुठं नोंदली जाणार आहे?
पण हा ॠतू निसटून गेला तर...
तर मग काय....उन्हाळाच...!!!
...पाऊस!!
रस्ते भिजताहेत..प्रतिबिंब रस्त्याला अगदी बिलगून चालताहेत..
कोपर्यावरचे कॉफी हाऊस, दोन फिल्टर कॉफी.. वाफाळलेला कॉफीगंध.. नाकातून थेट पोटात.. वाफेपलीकडे.. एक निस्तब्ध मन.. बोलू पाहातंय.. पण न बोलताही ऐकू येतंय....
मधेच ताडपत्री जोरात वाजू लागते.. झाड आवेगात कोसळू लागते.. सहज काही थेंब वार्यानं येतात..थोडं भिजतो..
सुखावतो...
कॉफीचा एक कडक कडक घुटका अलगद घेतो...समजूतदार पापण्या एकमेकांकडे पाहतात...
पाऊस बरसतच राहतो.. कॉफी संपते.. वेटर जवळ येतो; आपण ढगात पाहत म्हणतो....,"और एक कॉफी कडक!"

May 28, 2009
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज १२६ वी जयंती आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्य त्यांच्या प्रेरणादायी स्मृतींना त्रिवार विनम्र अभिवादन...!!!!
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्य त्यांच्या प्रेरणादायी स्मृतींना त्रिवार विनम्र अभिवादन...!!!!
May 20, 2009
गर्लफ्रेण्ड नसण्याचा अभिमान
अहो ऐकलं का ?
आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!
आमच्या बाईकच्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
आणि बाईक पूसण्याचे आम्ही कधीच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!
सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तासभर खातो
आणि बुड्ढी का बालचा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!
वीकएंड्ला आऊटींग करतो, फ़क्त मित्रांबरोबर्च घालवतो
काही नाही तर मस्त झोपा काढतो
आणि रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!
आमचे मोबाईलचे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्त घरी किंवा मित्रांना असतात,
आणि आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!
मित्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्लफ्रेण्ड नाही...!
कवी - अज्ञात.

February 13, 2009
Subscribe to:
Posts (Atom)